एम.आय.टी. एच.एस.सी. व्होकेशनल (एम.सी.व्ही.सी.) कनिष्ठ महाविद्यालय
ग्रामोद्योगिक शिक्षण मंडळ, छत्रपती संभाजीनगर संचलित — सिडको एन-४ येथे वर्ष १९८८–८९ पासून कार्यरत, दर्जेदार तांत्रिक शिक्षण देणारी सुसज्ज संस्था.
एका दृष्टीकोनातून उभी राहिलेली संस्था
ग्रामोद्योगिक शिक्षण मंडळ, छत्रपती संभाजीनगर यांनी ग्रामीण भागातील होतकरू विद्यार्थ्यांची शिक्षणाबाबतची तळमळ व गरज ओळखून वर्ष १९८८–८९ पासून एम.आय.टी. एच.एस.सी. व्होकेशनल (एम.सी.व्ही.सी.) कनिष्ठ महाविद्यालय ही संस्था छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सिडको, एन-४ या ठिकाणी सुरू केली आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सुरू असलेल्या सर्व खाजगी संस्थांपैकी दर्जेदार तांत्रिक शिक्षण देणारी व सर्व सोयींनी सुसज्ज अशी ही संस्था आहे. सदर संस्थेतून आजपर्यंत ३००० पेक्षा जास्त प्रशिक्षणार्थ्यांनी आपला अभ्यासक्रम पूर्ण करून मोठ्या-मोठ्या कंपन्यांमध्ये तसेच शासकीय आस्थापनांत रुजू होऊन काम करीत आहेत. तसेच बरेचसे विद्यार्थी स्वतःचा व्यवसाय करून स्वावलंबी झाले आहेत.
आम्ही का अस्तित्वात आहोत
ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजी (Automobile Technology)
- ऑटोमोबाईल क्षेत्रात वापरात असलेल्या सर्व टूल्स व उपकरणांची सविस्तर माहिती.
- पेट्रोल इंजिन, डिझेल इंजिन, सी.एन.जी., एल.पी.जी. इंधनावर चालणाऱ्या दुचाकी व चारचाकी वाहनांची देखभाल व दुरुस्ती.
- इंजिन दुरुस्ती, ट्रान्समिशन सिस्टीम, स्टेअरिंग सिस्टीम व ब्रेक सिस्टीमची रचना, कार्य, दुरुस्ती व टेस्टिंग — प्रात्यक्षिक ज्ञानासह.
- वाहनांमधील ऑटो इलेक्ट्रिक व ऑटो इलेक्ट्रॉनिक सिस्टीमबाबत प्रात्यक्षिक स्वरूपातून सविस्तर माहिती.
- ई.व्ही. वाहनांची गरज, रचना, कार्य आणि दुरुस्ती प्रात्यक्षिकातून.
- गाडीचे कॉम्प्युटराइज्ड व्हील अलायमेंट — महत्त्व, टेस्टिंग व सेटिंग.
- विद्यार्थ्यांना ड्रायव्हिंगचेही प्रशिक्षण दिले जाते.
- स्वतःचे ऑटोमोबाईल गॅरेज सुरू करता येते.
- ऑटोमोबाईल स्पेअर पार्ट विक्रीचा व्यवसाय.
- ऑईल, टायर, बॅटरी विक्रीचा व्यवसाय.
- स्वतःचे सर्व्हिसिंग सेंटर (2 & 4 Wheeler).
- व्हील अलायमेंट वर्कशॉप.
- फ्युएल इंजेक्शन पंप दुरुस्ती व कॅलिब्रेशन सेंटर.
- शासकीय व अशासकीय संस्थांत शिल्प निदेशक म्हणून नोकरी.
- महिंद्रा, टाटा, आयशर, ह्युंदाई अशा मोठ्या ऑटोमोबाईल कंपन्यांमध्ये नोकरी.
- रेल्वे, एस.टी. महामंडळ इत्यादी ठिकाणी मेकॅनिक म्हणून नोकरी.
