आमच्याबद्दल
ग्रामोद्योगिक शिक्षण मंडळ संचालित — कौशल्याधारित तांत्रिक शिक्षणाची भक्कम पायाभरणी, १९७९ पासून.
शाळेबद्दल
आमची दृष्टी
आमचे ध्येय
नेतृत्वाचा संदेश

ग्रामोद्योगिक शिक्षण मंडळाची स्थापना ग्रामीण व सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख आणि तांत्रिक शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याच्या ध्येयातून झाली. त्या काळात मराठवाड्यात तांत्रिक शिक्षणाच्या संधी अत्यंत मर्यादित होत्या. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, त्यांच्या व्यावसायिक कौशल्यांचा विकास व्हावा आणि ते स्वावलंबी बनावेत, या उद्देशाने संस्थेची मुहूर्तमेढ रोवण्यात आली.
या कार्याची सुरुवात रोटेगाव परिसरातून झाली. अत्यंत प्रतिकूल परिस्थिती, आर्थिक अडचणी आणि विविध अडथळ्यांना सामोरे जात संस्थेची पायाभरणी करण्यात आली. कोणत्याही राजकीय पाठबळाशिवाय केवळ समाजहिताची भावना, शिक्षणावरील दृढ विश्वास आणि अथक परिश्रम यांच्या बळावर ही चळवळ पुढे वाढत गेली.
कालानुरूप संस्थेने आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करत विद्यार्थीकेंद्रित शिक्षणपद्धती विकसित केली. नव्या तंत्रज्ञानाची ओळख, उद्योगाभिमुख शिक्षण आणि ग्रामीण विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न यामुळे ग्रामोद्योगिक शिक्षण मंडळाने मराठवाड्यात स्वतंत्र ओळख निर्माण केली. रोटेगाव येथे पेरलेले हे बीज पुढे औरंगाबादसह संपूर्ण मराठवाड्यात विस्तारत गेले आणि आज एक व्यापक शैक्षणिक चळवळ म्हणून विकसित झाले.
डॉ. वाय. ए. कवडे
– अध्यक्ष
ग्रा. शि. मंडळ, छत्रपती संभाजीनगर.

एम. आय. टी. तंत्रप्रशाळेच्या वतीने आपण सर्वांचे मनःपूर्वक स्वागत.
शिक्षण हे केवळ पदवी किंवा प्रमाणपत्र मिळविण्याचे साधन नसून व्यक्तिमत्त्व घडविण्याची, कौशल्ये विकसित करण्याची आणि समाजाप्रती जबाबदारीची जाणीव निर्माण करण्याची एक अखंड प्रक्रिया आहे. याच विचारातून एम. आय. टी. तंत्रप्रशाळा विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण, कौशल्याधारित आणि मूल्यसमृद्ध शिक्षण देण्यासाठी सातत्याने कार्यरत आहे.
आज तंत्रज्ञान आणि उद्योग क्षेत्रात झपाट्याने बदल होत आहेत. या बदलांशी सुसंगत राहण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये तांत्रिक ज्ञानाबरोबरच नवोपक्रम, सर्जनशीलता, समस्या सोडविण्याची क्षमता, नेतृत्वगुण आणि आत्मविश्वास विकसित होणे अत्यावश्यक आहे. आमची तंत्रप्रशाळा आधुनिक अध्यापन पद्धती, प्रयोगाधारित शिक्षण, उद्योगाभिमुख प्रशिक्षण आणि कौशल्य विकास कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना भविष्याच्या संधींसाठी सक्षम बनवत आहे.
आमच्या अनुभवी शिक्षकवृंदाचे मार्गदर्शन, आधुनिक सुविधा आणि विद्यार्थीकेंद्रित वातावरण यांमुळे प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या क्षमता ओळखून उत्कृष्टतेकडे वाटचाल करण्याची संधी मिळते. शैक्षणिक गुणवत्तेसोबतच चारित्र्य, शिस्त, प्रामाणिकपणा आणि सामाजिक मूल्यांचा विकास ही आमच्या शिक्षणपद्धतीची महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत.
संस्थेच्या प्रगतीमध्ये विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि समाज यांचे सहकार्य अत्यंत मोलाचे आहे. आपल्या विश्वास, सहकार्य आणि पाठबळामुळेच आम्ही गुणवत्तापूर्ण तांत्रिक शिक्षणाचे नवे आदर्श निर्माण करण्याच्या दिशेने आत्मविश्वासाने पुढे जात आहोत.
सक्षम, कुशल, जबाबदार आणि राष्ट्राच्या विकासात मोलाचे योगदान देणारे नागरिक घडविण्याचा आमचा संकल्प भविष्यातही अशाच निष्ठेने आणि समर्पणाने सुरू राहील.
– सरचिटणीस
ग्रा. शि. मंडळ, छत्रपती संभाजीनगर.

प्रिय विद्यार्थी, पालक व हितचिंतक,
आपल्या संस्थेच्या शैक्षणिक परिवारात आपले मनःपूर्वक स्वागत आहे. आमच्या प्रशालेचे ध्येय विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवून त्यांना ज्ञान, कौशल्य, शिस्त आणि संस्कारांनी समृद्ध करणे हे आहे. बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत व्यावसायिक कौशल्ये प्रदान करून त्यांना आत्मनिर्भर व जबाबदार नागरिक बनविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
प्रशालेतील अनुभवी शिक्षकवृंद, आधुनिक शैक्षणिक साधने आणि विद्यार्थी-केंद्रित उपक्रम यांच्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थ्याच्या सुप्त गुणांचा विकास करण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच नैतिक मूल्ये, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रीय भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्यावर आमचा विशेष भर आहे.
विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी पालक, शिक्षक आणि संस्था यांच्यातील समन्वय अत्यंत महत्त्वाचा आहे. आपण सर्वांच्या सहकार्याने प्रशालेची प्रगती आणि विद्यार्थ्यांचे यश अधिकाधिक वृद्धिंगत होईल, असा मला विश्वास आहे.
आपल्या सर्वांना उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा!
श्री.गायकवाड नंदकुमार बाबुराव
मुख्याध्यापक
एम. आय. टी. तंत्रप्रशाला, छत्रपती संभाजीनगर.
